
नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलिस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीने, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोहोचता यावे यासाठी करण्यात आला आहे यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकांद्वारे होत असे, परंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्य नारिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असून, अधिकारी बदली झाल्यास देखील मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलीसांशी सतत संपर्क साधता येईल.