मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police crestनंदुरबार पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
नंदुरबार पोलीस
Maharashtra Police crest

नंदुरबार पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

नंदुरबार नियंत्रण कक्ष:
02564-210113
sp.nandurbar@mahapolice.gov.in

विभाग

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • संपर्क करा
  • ठिकाणे

सेवा

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती

मदत मिळवा

  • तातडीची मदत: ११२
  • बाल हेल्पलाईन: १०९८
  • महिला हेल्पलाईन: १०९१
  • तक्रार
  • अभिप्राय

सार्वजनिक नोंदी

  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती
  • साइट मॅप
  • अस्वीकरण
  • अटी आणि शर्ती
  • गोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: १ नोव्हेंबर, २०२६ रोजी १०:५२ AM वाजताअभ्यागत 314

© 2026 नंदुरबार पोलीस. सर्व हक्क राखीव.

उंची: SRTM, Terrain Tiles on AWS. उपग्रह प्रतिमा: EOxCloudless https://cloudless.eox.at by EOX IT Services GmbH (Contains modified Copernicus Sentinel data 2016 & 2017)

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

" ऑपरेशन शोध " मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी, 98 महिला व बालकांचा शोध घेण्यात यश.

" ऑपरेशन शोध " मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी, 98 महिला व बालकांचा शोध घेण्यात यश.

दिनांक 17/04/2025 ते दिनांक 15/05/2025 रोजी दरम्यान हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेणेकामी " ऑपरेशन शोध " ही मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी, 98 महिला व बालकांचा शोध घेण्यात यश आले आहे.

जनजागृती कार्यशाळा

जनजागृती कार्यशाळा

महाराष्ट्र शासनाचे 100 दिवस कृती आराखडा उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नवीन फौजदारी कायदा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.शिवाजी कचरे यांची विशेष उपस्थिती.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात

नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलिस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीने, नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोहोचता यावे यासाठी करण्यात आला आहे यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकांद्वारे होत असे, परंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्य नारिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असून, अधिकारी बदली झाल्यास देखील मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलीसांशी सतत संपर्क साधता येईल.

तक्रार निवारण दिन

तक्रार निवारण दिन

राज्य शासनाचे 100 दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिनाचे आयोजन. पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त.एस यांनी स्वतः शहादा येथे उपस्थित राहून केले नागरिकांचे तक्रारींचे निवारण. त्याचप्रमाणे शहादा पोलीस ठाणे येथे वृक्षारोपण तसेच खेळ मैदानाचे भूमिपूजन देखील केले

महिला व बाल सुरक्षा

महिला व बाल सुरक्षा

पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार तर्फे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच आश्रम शाळा यांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षक वर्ग यांची "महिला व बाल सुरक्षा" अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र शासनाकडून "सेफ स्कूल कॅम्पस" ठेवणेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांबाबत चर्चा करण्यात आली व त्यांचे अनुपालन करणे बाबत पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांचेकडून सर्व शाळांचे व्यवस्थापनाला आवाहन करण्यात आले.

मिशन सक्षम

मिशन सक्षम

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांचे संकल्पनेतून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळून सक्षम बनविण्याचा उपक्रम